शिवप्रहार न्युज - इस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करणाऱ्या यशला श्रीरामपूर शहर पोलिसांकडून तात्काळ अटक...
इस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करणाऱ्या यशला श्रीरामपूर शहर पोलिसांकडून तात्काळ अटक...
श्रीरामपूर -दिनांक 30/06/2023 रोजीपासुन यातील अल्पवयीन पिडीत फिर्यादीसोबत आरोपी नामे यश हरिभाऊ चौधरी वय 21 वर्षे, रा. चौधरी वस्ती, जळगाव, ता राहता जि. नगर यांने इंस्टाग्रामवर ओळख करुन तिच्यासोबत मैत्री केली व शाळेत कॅम्पसमध्ये तिचे सोबत फोटो काढले व ती शाळेतुन येताना जाताना तिचा पाठलाग करुन तु मला फार आवडतेस असे बोलुन तीचे मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन फिर्यादीचा विनयभंग केला व दिनांक 13/03/2024 रोजी फिर्यादीसोबत काढलेले फोटो फिर्यादीचे नातेवाईकांना इंस्टाग्रामवर टाकुन फिर्यादीची समाजात बदनामी होईल असे कृत्य केले आहे. वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 299/2024 भादंवि कलम 354 (अ), 354 (ड), सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 प्रमाणे दिनांक 14/03/2024 रोजी रात्री 01/31 वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अल्पवयीन पिडीतेबाबतचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांनी सदर आरोपीचा शोध घेणेकामी तपास पथकास आदेश दिले, त्यानुसार तपास पथकाने तात्काळ आरोपीचा शोध घेतला असता गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, तो त्याच्या राहते घरी चौधरी वस्ती, जळगाव ता. राहता येथे असुन तो सकाळी मुंबईला पळून जाणाच्या तयारीत आहे. अशी माहिती मिळताच तपास पथक हे रात्रीच 02/30 वा. सुमारास त्याचे राहते घरी गेले असता सदरचा आरोपी हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांने वरील प्रमाणे नाव पत्ता सांगितले असता त्याच्याकडे नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहर पोलीसांकडुन पोक्सो कायदयाबाबत जनजागृतीसाठी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, 18 वर्षपेक्षा कमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस, प्रत्यक्ष वा सोशल मिडीयावरुन पाठलाग केल्यास, प्रेमाच्या जाळयात ओढल्यास, पळवुन नेल्यास असे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व त्यांना असे कृत्य करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीविरुध्द तात्काळ पोक्सो कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येते.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक ,श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, म. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे, परि. पोलीस उपनिरीक्षक / दिपक मेढे, पोना/ रघुवीर कारखेले, पोकों/ राहुल नरवडे, पोकों / गौतम लगड, पोकों / रमिझराजा अत्तार, पोकों / संभाजी खरात, पोकां/अजित पटारे, पोकॉ राम तारडे, मपोकों/ मिरा सरग तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दरेकर, पोना / सचिन धनाड, पोना/वेताळ यांनी केली.या दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली म. पोलीस उपनिरीक्षक / सुरेखा देवरे या करीत आहेत.