शिवप्रहार न्युज - विनयभंगप्रकरणी जामखेड येथीलर त्नदीप संस्थेचा डॉ. भास्कर मोरे यास उसातुन ताब्यात घेतले …
विनयभंगप्रकरणी जामखेड येथीलर त्नदीप संस्थेचा डॉ. भास्कर मोरे यास उसातुन ताब्यात घेतले …
नगर-
नमूद बातमीची हकिगत अशी की, दिनांक 20/10/2022 रोजी पिडीत फिर्यादी हिस रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी, ता. जामखेडचा संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे याने फार्मसी कॉलेजचे प्रिन्सीपल ऑफिसचे ऍ़न्टी चेंबरमध्ये बोलावुन घेवून पिडीतेशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. सदर घटनेबाबत दिनांक 08/03/2024 रोजी जामखेड पो.स्टे.गु.र.नं. 104/2024 भादविक 354, 354 (अ) प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थींनीनी आरोपी संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यास अटक करणे करीता जामखेड येथे उपोषणास बसल्या होत्या. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 09/03/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात, पोउनि/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बबन मखरे, भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजू काळे, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांचे 2 विशेष पथके तयार करुन पथकास आरोपीची माहिती काढुन त्यास ताब्यात घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
वरील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा शिक्षित व सधन असल्याने आरोपीचा शोध घेण्याचे पोलीसासमोर आव्हान होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने आरोपीचे मित्र व नातेवाईक यांचेकडे जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, बारामती, पुणे परिसरात चौकशी सुरु केली. तसेच दुसरे पथक हे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत होते.त्या दरम्यान असे लक्षात आले की,आरोपी हा वेगवेगळी 7-8 नवीन सिमकार्ड वापरुन पोलीसांना सुगावा लागु नये याचा प्रयत्न करत होता.
पथकाने तांत्रिक विश्लेषण व नातेवाईकांकडे केलेल्या चौकशी दरम्यान पोनि/श्री. दिनेश आहेर यांना आरोपी भास्कर मोरे हा पळसदेव, भिगवण, जिल्हा पुणे येथे त्याचा नातेवाईक नामे अशोक चव्हाण याचेकडे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार दोन्ही पथके ही आरोपीचा नातेवाईक अशोक चव्हाण यांचे राहते घरी पळसदेव, भिगवण येथे पोहचली असता नमुद आरोपी हा तेथुन देखील पोलीस पथक पोहचण्या आधीच निघुन गेल्याचे समजले. त्यानुसार पथकाने तात्काळ पळसदेव, भिगवण, ता. इंदापुर, जिल्हा पुणे येथील परिसरात आरोपीचा शोध घेता तो ऊसाचे शेतात लपुन बसलेला मिळुन आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे पुर्ण नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) भास्कर रामभाऊ मोरे वय 52, रा. जामखेड बस स्टॅण्ड मागे, ता. जामखेड असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीस जामखेड पो.स्टे.गु.र.नं. 104/2024 भादविक 354, 354 (अ) या गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पो.स्टे. करत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.