शिवप्रहार न्युज - पाटील" नाव सांगून मैत्री केली अन् नंतर बळजबरी बलात्कार...
"पाटील" नाव सांगून मैत्री केली
अन् नंतर बळजबरी बलात्कार...
कोपरगाव (शिवप्रहार न्युज)-सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकवर एक खळबळजनक घटना घडलीये. फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय.या आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आसिफ युनूस पठाण (वय ३०, रा.राहाता), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय विवाहिता ही कोपरगाव तालुक्यातील एका गावात राहणारी आहे.
विवाहित महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून "पाटील" असे बनावट नाव सांगून मैत्री करून ४ जुलै २०२४ रोजी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहते घरी जाऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यात घडली.
या प्रकरणी पीडित महिलेने आरोपी असीफ युनुस पठाण, (वय ३० वर्षे) राहता ता. राहाता याच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करीत आहे.