शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात तिरंगी लढतच होणार ...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात तिरंगी लढतच होणार ...

श्रीरामपुरात तिरंगी लढतच होणार ...

श्रीरामपूर - श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी आज 04 नोव्हेंबर हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता.त्यादरम्यान 12 जणांनी अर्ज माघारी घेतले तर 16 जणांनी अर्ज कायम ठेवले आहेत.त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून आमदार लहू कानडे व काँग्रेस पक्षाकडून हेमंत ओगले या तीन मुख्य उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

       यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजाभाऊ कापसे,कोल्हापूरचे युवराज श्रीमंत संभाजीराजे यांच्या स्वराज पक्षाकडून जितेंद्र तोरणे,वंचितचे मोहन व इतर अपक्ष असे एकुण 16 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.