शिवप्रहार न्युज - बिबट्याचा दोघांवर हल्ला; महिला जखमी…
बिबट्याचा दोघांवर हल्ला; महिला जखमी…
वैजापूर - श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ चालू असतानाच बिबट्याने श्रीरामपूर ला लागून असलेल्या वैजापूर तालुक्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.टेंभी येथील रहिवासी असलेल्या आसराबाई गंगाराम पवार व गौरव गुलाब पवार हे दोघे काल नागमठाण येथील हॉस्पिटलकडे जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सदर महिला जखमी झाली आहे.महिलेवर चामे हॉस्पिटल नागमठाण येथे उपचार चालू आहे.
दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून बिबट्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ झाली आहे.शासनाने नरभक्षक बिबट्यांविरोधात ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.