शिवप्रहार न्युज - शिर्डीत आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल !
शिर्डीत आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल !
शिर्डी ( शिवप्रहार न्युज) - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र सतिष आव्हाड यांचेवर शिर्डी पोलीसात भादवि कलम २९५ (अ) प्रमाणे हिंदुंच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी निलेश बाबुराव पेंशनवार,माजी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की,शिर्डीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ०२ दिवसांचे शिबिर होते. त्यात हिंदुंचे दैवत प्रभु श्रीराम यांचे विषयी वादग्रस्त वक्तव्य करत श्रीराम वनवासात असतांना मांसाहार करीत असले बाबत बोलून माझ्या व संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या व जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण केला. असे तक्रार अर्जात व फिर्यादीत म्हटले असून CID व्हीसी आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे.पो.नि.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बलैय्या हे पुढील तपास करीत आहेत .प्रभु श्रीरामांविषय वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आडचणी वाढण्याची शक्यता आहे.आव्हाड हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धीझोतात येतात अशी त्यांचे विरोधक त्यांच्यावर नेहमी टिका करतात .