शिवप्रहार न्युज - परभणी घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपुरात जोरदार आंदोलन…
परभणी घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपुरात जोरदार आंदोलन…
श्रीरामपूर- परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटत असतांना श्रीरामपुरात देखील या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. यावेळी श्रीरामपुरातील आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन श्रीरामपूर बंद चे आवाहन केले.याला श्रीरामपुरातील व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.
तसेच यावेळी फेरी काढत पोलीस ठाण्याचे PI श्री.नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आले.आंबेडकरवादी पक्ष व चळवळीतील नेते कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध यावेळी केला.