शिवप्रहार न्यूज - कुख्यात गुंड पाप्या शेख टोळीविरुद्ध मोक्का; येरवडा जेलमधुन शस्त्र विक्रीचे रॅकेट...

शिवप्रहार न्यूज - कुख्यात गुंड पाप्या शेख टोळीविरुद्ध मोक्का; येरवडा जेलमधुन शस्त्र विक्रीचे रॅकेट...

कुख्यात गुंड पाप्या शेख टोळीविरुद्ध मोक्का; येरवडा जेलमधुन शस्त्र विक्रीचे रॅकेट...

    श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूरातील बेलापूर बुद्रूक येथील बाजारतळावर 25 मार्च रोजी 4 गावठी कट्ट्यासह 8 जिवंत काडतूस दत्तात्रय सुरेश डहाळे रा.शिर्डी, सुलतान फत्तेमोहंमद शेख रा.बेलापूर, श्रीरामपूर यांना पोलिसांनी पकडले होते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं.299/2023 भादवि कलम 384,385,120 (ब) व भारतीय हत्यार कायदा 3/25,7 प्रमाणे दाखल गुन्ह्यात सहभाग असलेल्या पाप्या शेख टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

   टोळीचा टोळीप्रमुख पाप्या शेख असून तो आणि टोळीतील इतर सदस्यांनी वेळोवेळी संघटितपणे मालमत्ता विषयक, शरीराविरुद्धचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

यातील विशेष बाब म्हणजे शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पाप्या शेख हा येरवडा कारागृहात असून तो तिथून अवैध शस्त्रास्त्र विक्रीचे रॅकेट चालवत होता. त्यानुसार सलीम उर्फ पाप्या ख्वाजा शेख (टोळी प्रमुख), दत्तात्रय सुरेश डहाळे, सुलतान फत्तेमोहम्मद शेख, रवी राजेंद्र बनसोडे, राहुल सिंग, तन्वीर मोहम्मद हनीफ रंगरेज, गणेशसिंग विठ्ठलसिंग तौर, कुमार जगन्नाथ खेत्री या सर्व आरोपीविरुद्ध सदर गुन्ह्यास मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून गुन्ह्यांचा पुढील तपास डीवायएसपी संदीप मिटके हे करत आहेत. पोलीस महानिरिक्षक बी.जे.शेखर पाटील, एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोक्का कारवाई झाली .