शिवप्रहार न्युज - जिल्हा बॅंकेत अधिकर्‍याने महिलेला मारली मिठी! खळबळ!! 

शिवप्रहार न्युज - जिल्हा बॅंकेत अधिकर्‍याने महिलेला मारली मिठी! खळबळ!! 

जिल्हा बॅंकेत अधिकर्‍याने महिलेला मारली मिठी! खळबळ!! 

कोपरगाव/शिर्डी ( शिवप्रहार न्युज) कोपरगाव तालुक्यातील नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या एका गावातील शाखेत नोकरी करणारी एक ३४ वर्षाची तरुण महिला बॅंकेत असतांना तेथे बॅंकेचा तालुका विकास अधिकारी अविनाश ज्ञानदेव काटे याने पिडीत तरुणीला हजेरी मस्टरवर सही करायला सांगीतले व बोलला की,”मला बॅंकेची कॅश चेक करायची आहे”.त्यावर तरुणी म्हणाली मी स्ट्रॉगरूम मधून कॅश घेवून येते. अविनाश काटे म्हणाला आत्ताच चेक करायची तेव्हा तरुणी स्ट्रॉगरूम उघडून तिजोरी उघडत असतांना आरोपी अविनाश काटेने तरुणीला पाठीमागून मिठी मारुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व विनयभंग केला.या घटनेने पिडीत घाबरून गेली तिने कोपरगांव तालुका पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी अविनाश ज्ञानदेव काटे रा . साईसीटी,कोपरगाव याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        पोनि कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मुकणे हे पुढील तपास करीत आहेत . जिल्हा सहकारी बॅंक ही मोठी राजकीय बॅंक असून तिच्या जिल्हाभर शाखा आहेत.यात अनेक महिला कर्मचारी आहेत.या घटनेमुळे त्याच्यात एकच खळबळ उडाली असून मोठे राजकीय नेते व बॅंकेचे व्यवस्थापन या विनयभंग करणाऱ्यावर अजुन कोणती कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .