शिवप्रहार न्युज - 'द केरळ स्टोरी' पिक्चरसारखी घटना घडतांना दिसत असल्यामुळे उंबरेतील हिंदू आक्रमक झाले...
'द केरळ स्टोरी' पिक्चरसारखी घटना घडतांना दिसत असल्यामुळे उंबरेतील हिंदू आक्रमक झाले...
राहुरी - राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात नुकतेच प्रदर्शित होऊन गेलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटासारखी घटना घडत असल्यामुळे तेथील हिंदू बांधवांच्या भावना अनावर झाल्या. द केरळ स्टोरी या चित्रपटामध्ये 'लव जिहाद' या अतिशय गंभीर विषयासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. हिंदू मुलींना षडयंत्र करून कसे धर्मांतरित केले जाते, त्यांचा कसा छळ केला जातो व त्यातून त्यांचे आयुष्य बरबाद होते यासंबंधी शालिनी उन्नीकृष्णन या मुलीसोबत घडलेली सत्य घटना त्यात दाखवण्यात आलेली आहे. त्या चित्रपटाला काहीसे मिळती-जुळती घटना उंबरे येथे घडत होती इयत्ता ८ वी तील एका अल्पवयीन हिंदू मुलीला आवेज शेख याच्यासोबत व त्याच्या मित्रांसोबत मैत्री करण्यास भाग पाडण्यात आले.
तसेच आवेज शेख याच्या बहिणीने तिला हिना नावाच्या शिक्षिकेकडे नेले. त्या शिक्षिकेने तिला मुस्लिम होण्यासंदर्भात माहिती दिली. मुस्लिम झाल्यावर काय फायदे मिळतात हे तिला सांगितले. रमजानच्या दिवशी त्या अल्पवयीन मुलीला शीरखुर्मा खायला बोलावून तिच्यासोबत आरोपींनी फोटो काढले. आवेज शेख याने त्या अल्पवयीन मुलीचे नाव वापरुन बनावट सोशल मेडिया अकाऊंट निर्माण करून ती त्याच्यासोबत बोलत असल्याचा बनाव केला व माझ्यासोबत पळून आली नाही तर तुझे फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपींविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्यातील कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या मदतीला आलेल्या काही ग्रामस्थांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे.
परंतु घटनेच्या मुळाशी जाऊन पाहिले तर ही गोष्ट स्पष्ट होते की, इयत्ता आठवीला शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत एवढे भयानक षडयंत्र जर कोणी करत असेल तर कोणताही पिता, भाऊ, नातेवाईक अथवा समाजबांधव यांचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान अजुन काही पिडीत मुली अशा षडयंत्राला बळी पडल्याची माहिती असुन त्या देखील तक्रारीसाठी सरसावल्या असल्याचे कळत आहे.त्यामुळे हे एक मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तरी असे कृत्य जर एखाद्या जज, एखाद्या उच्चपदस्थ राजकारणी वा अधिकार्यासोबत त्याच्या परिवारासोबत झाले तर तो देखील असाच संताप व्यक्त करेल.
ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या भारतामध्ये आपण राहतो तेथे शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्य होते तेव्हा तिथे मायलेकींची अब्रू सुरक्षित होती. आज ही अल्पवयीन मुलगीसुद्धा शिवछत्रपतींचीच लेक आहे आणि तिच्या रक्षणासाठी धावलेले हे शिवभक्त मावळेच आहेत. सरकारने लेकी-बाळींसोबत चालणारे हे 'लव जिहाद' षडयंत्र थांबवण्याकरता सर्वप्रथम महाराष्ट्रात कायदा पारित करून लागू करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शिवप्रहार प्रतिष्ठानची सातत्याने हीच मागणी राहिली आहे. नुकतेच मुंबई येथे आझाद मैदानात 17 दिवस धरणे आंदोलन याच लव जिहादविरोधात कायदा व्हावा याकरता आपण केले.
तरी सरकारने आता हिंदू मुलींच्या पालकांचा, परिवाराचा, समाजाचा अंत पाहू नये लवकरात लवकर हा कायदा पारित करून शिवछत्रपतींच्या लेकींची अब्रू सुरक्षित करावी.