शिवप्रहार न्युज - मुख्यमंत्र्यांची श्री.क्षेत्र मोहटादेवी देवस्थानला भेट...

शिवप्रहार न्युज -  मुख्यमंत्र्यांची श्री.क्षेत्र मोहटादेवी देवस्थानला भेट...

मुख्यमंत्र्यांची श्री.क्षेत्र मोहटादेवी देवस्थानला भेट...

पाथर्डी - बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले असताना त्यांनी यावेळी बीड जिल्ह्याला लागूनच असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्री.क्षेत्र मोहटा देवी देवस्थान भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यासमयी देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे,आमदार मोनिका राजळे,विश्वस्त अक्षय गोसावी ,डॉक्टर श्रीधर देशमुख यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.

        तसेच यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित असल्याने त्यांचाही मुख्यमंत्र्यांसमवेत सत्कार करण्यात आला.मुख्यमंत्र्यांच्या विशेष सहकार्याने देवस्थानला १० एकर जमीन मिळाली आहे.त्याचा विकास आराखडा मंजूर झाला असून त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावा अशी देवस्थान समितीने यावेळी मागणी केली.