शिवप्रहार न्युज - ST बस अडवून श्रीरामपुरात पोलिसाला धक्काबुक्की ...

ST बस अडवून श्रीरामपुरात पोलिसाला धक्काबुक्की ...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सचिन दुकळे हे संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन बसने जात असताना या एसटी बसला श्रीरामपूर शहरातील नेवासारोड वरील मॉर्डन हायस्कूल(पाटणी विद्यालय) समोर मोटारसायकल आडवी लावून,बस थांबवून दोन जणांनी धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली.
तसेच आरोपींनी दुकले,पोलिस शिपाई यांना "तु संभाजीनगर कोर्टात गुह्याचे कागद जमा करायला कसा जातो,तुला पाहून घेतो"अशी धमकी देखील दिली.या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दुकळे यांच्या फिर्यादीवरून दाखल झाला आहे. दरम्यान अधिक माहिती अशी समजते की,यातील आरोपी संकेत यादव व सर्वेश यादव, राहणार- वार्ड नंबर ०१, श्रीरामपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे.