शिवप्रहार न्यूज - वाहन हळू वा जोरात चालवणे आपल्याच हातात;श्रीरामपूर RTO अभियानात न्या.संजय कुलकर्णी यांचे वक्तव्य…

वाहन हळू वा जोरात चालवणे आपल्याच हातात;श्रीरामपूर RTO अभियानात न्या.संजय कुलकर्णी यांचे वक्तव्य…

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) समोरच्या वाहनचालकाची चुकी असली तरी आपण अपघात टाळू शकतो कारण वाहन -गाडी जोरात (वेगात ) चालवायचे की हळू हे आपल्याच हातात असते असे प्रतिपादन श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय कुलकर्णी यांनी केले . काल श्रीरामपूर RTO कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष सत्र न्यायाधीश संजय कुलकर्णी हे होते. तर प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश आर.बी गीरी, सह दिवाणी न्यायाधीश विनय कांबळे,डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, जेष्ठ पत्रकार मनोज आगे, पोनि नितिन देशमुख,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी,मोटार वाहन निरिक्षक पद्माकर पाटील,आरटीओ अधिकारी धिरज भामरे,रोहीत पवार सिध्दार्थ मुरकुटे, बाबासाहेब गवारे, अशोक गाडेकर, करण नवले व इतर मान्यवर उपस्थित होते . 
        यावेळी पुढे बोलतांना संजय कुलकर्णी म्हणाले की, एका अपघाताच्या खटल्याची माहीती एकामुलाचे वडील सांगत होते की आम्ही अकोल्या वरून शेगांवला चाललो होतो समोरून जोरात गाड़ी आली आणि तिने आमच्या गाडीला धडक दिली .मी जखमी होवून बेशुद्ध झालो मला ०३ दिवसांनी शुद्ध आली.माझी पत्नीही जखमी बेशुद्ध होती ती पाच दिवसांनी शुद्धीवर आली.असे सांगत ती व्यक्ती माझ्याकडे टक लावून पहात होती मी पुढे काय झाले विचारले तेव्हा तो व्यक्ती मोठ्याने ओरडला व म्हणाला माझा मुलगा शुद्धीवरच आला नाही आणि तो खाली बसला हे ऐकूण माझ्या ह्दयात खड्डा पडला.१८ वर्षाचा मुलगा अपघातात मेला या अपघाताची दाहकता कशी होते.असा न्यायालयातला अनुभव सांगत न्यायाधीश संजय कुलकर्णी हे म्हणाले की,अनेक वर्ष वाहन चालविणाऱ्याचे अनुभव घेतले पाहीजे !माझी चुक नव्हती मी डाव्याबाजुने होतो . समोरचाच घुसला ! डिव्हायडर मधून प्राणि आला .या पेक्षा समोरच्याची चुक असली तरी आपण सुरक्षीत वाहन चालवीले तर अपघात टाळू शकतो असे ते म्हणाले . 
           यावेळी बोलतांना न्यायाधीश आर .बी . गीरी म्हणाले की, अपघातामुळे माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होते.अपंगत्व येते तेव्हा वाहन चालवतांना नियमांचे पालन करावे असे सांगत त्यांनी आरटीओ अधिकारी अनंता जोशी यांच्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे कौतुक केले . यावेळी बोलतांना डीवायएसपी बसवराज शिवपुजे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात खुन होण्याच्या प्रकारापेक्षा अपघातात मरणार्यांची संख्या जादा आहे . रस्ते अपघात कमी होण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असून मद्य पिऊन वाहन चालविल्यास कठोर कारवाई केली जात आहे.असे त्यांनी सांगीतले.
       तसेच यावेळी बोलतांना जेष्ठ पत्रकार मनोज आगे म्हणाले की,दारु पिऊन वाहन चालवनाऱ्यांवर ३१ डिसेबरला मोठी कारवाई होते.पण वर्षभर जिल्हयात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर आरटीओ आणि पोलीसांनी कारवाई सुरू ठेवली पाहीजे! दारू पिणारे गाड़ी चालक दारू पिऊन थरथर कापण्याऐवजी पोलीस व आरटीओ च्या कारवाईने थर थर कापले पाहीजेत तरच सामानांचे जीव वाचतील. नातेवाईकांनी वाहन चालवायला शिकवणे याऐवजी वाहन प्रशिक्षण केंन्द्राकडून वाहन चालविणे शिकल्यास चांगले चालक तयार होतील. आगे पुढे म्हणाले ऊसाच्या ओव्हरलोड वाहनांममुळे अनेक अपघात होतात . अनेक नागरीकांच्या सतत तशा तक्रारी आहेत तरी त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी मांडली . 
        यावेळी कार्यकमाचे आयोजक श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे प्रमुख अधिकारी अनंता शिंदे यांनी रस्ता सुरक्षा अभियान देशभर राबविले जाते. आपल्या विभागात नागरीकांमध्ये व वाहनचालक यांना रस्ते वाहतुक नियमांचा प्रसार व प्रचार व्हावा ,अपघात कमी व्हावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे सांगून सर्व वाहतुकीचे नियम RTO पुस्तिकेत देण्यात आले आहेत . गाडी चालवतांना मोबाईलवर बोलणे ! दारूपीऊन गाड़ी चालवणे ! ओव्हरलोड गाड्या चालवण हा कायद्याने गुन्हा असून RTO श्रीरामपूर विभागाच्या ०७ तालुक्यात २०२४ मध्ये रस्ते अपघातात ४५४ जणांनी आपला जीव गमावला. त्यात २४१ दुचाकी चालक तर १०६ चारचाकी चालक मयत झाले . अपघात टाळण्यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट तर चारचाकी वाल्यांनी सिटबेल्टचा वापर करावा. वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात नक्कीच कमी होतात.तेव्हा रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून नागरीकांमध्ये नियमांचा प्रसार व पचार करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगून RTO अधिकारी अनंता जोशी यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर मागचे बाजूस लावने सक्तीचे केल्याचे सांगीतले.तसेच रस्ता सुरक्षा अभियान ०१ फ्रेब्रुवारी पर्यत सुरु राहणार आहे .कार्यकमाचे सुत्रसंचलन आरटीओ धीरज भामरे यांने केले . रस्ता सुरक्षा अभियान पुस्तिकेत यावेळी प्रकाशन करण्यात आले.या कार्यकमाला तरुण -तरुणी व प्रमुख नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते .

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) समोरच्या वाहनचालकाची चुकी असली तरी आपण अपघात टाळू शकतो कारण वाहन -गाडी जोरात (वेगात ) चालवायचे की हळू हे आपल्याच हातात असते असे प्रतिपादन श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय कुलकर्णी यांनी केले . काल श्रीरामपूर RTO कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष सत्र न्यायाधीश संजय कुलकर्णी हे होते. तर प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश आर.बी गीरी, सह दिवाणी न्यायाधीश विनय कांबळे,डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, जेष्ठ पत्रकार मनोज आगे, पोनि नितिन देशमुख,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी,मोटार वाहन निरिक्षक पद्माकर पाटील,आरटीओ अधिकारी धिरज भामरे,रोहीत पवार व इतर मान्यवर उपस्थित होते . 