शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात १०७० किलो गोमांस जप्त; तिघांवर गुन्हा
श्रीरामपुरात १०७० किलो गोमांस जप्त; तिघांवर गुन्हा
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- शहरातील वॉर्ड नं. २ मधील कुरेशी मोहल्ला येथे शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे १०७० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद ऊर्फ भुऱ्या मुस्ताक कुरेशी, अरबाज रियाज कुरेशी, फय्याज रियाज कुरेशी असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत आहेत व कत्तल केलेले मांसविक्री करण्याकरीता घेवुन जाणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस पथकास नमूद ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, पोलीस पथक हे पंच व पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सदर ठिकाणी गेले असता तेथे तीन इसम गोंवशीय जनावराचे कत्तल केलेल्या मांसाचे छोटे छोटे तुकडे करतांना दिसले. या प्रकरणी तिन्ही आरोपीविरुध्द महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियमः १९९५ चे सुधारित कायदा सन २०१५ चे कलम ५, ५ (अ) (ब) (क), ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, हवालदार शफिक शेख, पोलीस नाईक शरद अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, अजित पटारे, अमोल पडोळे, धंनजय वाघमारे, अमोल गायकवाड, आजिनाथ आंधळे, रविंद्र शिंदे, अकबर पठाण, रामेश्वर तारडे, मिरा सरग यांनी केली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम करीत आहे.