शिवप्रहार न्यूज - शिवप्रहारच्या मावळ्यांमुळे ०७ तान्ह्या वासरांना मिळाले जीवनदान; श्रीरामपूर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल...

शिवप्रहारच्या मावळ्यांमुळे ०७ तान्ह्या वासरांना मिळाले जीवनदान; श्रीरामपूर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल...

श्रीरामपूर -काल रविवार दि.१६/०४/२०२३ रोजी दुपारी श्रीरामपूर शहरातील इंदिरानगर भागात बोरावके कॉलेज मागे काही गोवंशांना कतली साठी घेऊन एक टेम्पो जात असल्याची माहिती “शिवप्रहार प्रतिष्ठान”चे अशोकनगर येथील मावळ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलिसांना संपर्क केला. त्यावरून पोलीस निरीक्षक श्री.हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ पोलीस हवालदार श्री.परदेशी,श्री.अहिरे,श्री.पवार,

श्री.कारखेले,श्री.गोसावी यांना स्टाफसह कारवाई करता रवाना केले.त्यानंतर शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी पोलीस पथकाच्या सहकार्याने या कत्तलीसाठी जाणाऱ्या टेम्पोला पकडले. पोलिसांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

        शहर पोलिसांनी टेम्पो अशोक लेलँड क्रमांक एम एच 04 जीएफ 8765 व 07 गोवंशय वासरे यांना ताब्यात घेतले आहे.एकुण 05 लाख ,2 हजार ,आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी जावेद कुरेशी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयपणे वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम यातील कलमाप्रमाणे कारवाई झाली आहे. 

      यावेळी शिवप्रतिष्ठान,श्रीरामपूर प्रमुख, गोसेवक किसन ताकटे , गणेश तरकसे व सहकाऱ्यांनी तान्ह्या वासरांना दूध पाजले.

तसेच किसन ताकटे, शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी या वासरांना संगमनेर गो शाळेमध्ये सुखरूपरीत्या पोहोच केले.