शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या तरुणीवर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार...
श्रीरामपूरच्या तरुणीवर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार...
श्रीरामपूर/शिर्डी (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर २ परिसरात राहणाऱ्या २३ वर्षाच्या तरुणीचा मैत्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तिला शिर्डी येथील पानमळा ५०० रूम जवळील हॉटेल सीतारा (ओयो हॉटेल) येथील रूम नंबर १०१ मध्ये नेऊन तिच्याशी बळजबरी करून तिला धमकावून तिच्या इच्छेविरुद्ध आरोपी शेख याने तरुणीवर बलात्कार केला.
याप्रकरणी काल पीडीत तरुणीने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून बलात्कार करणारा आरोपी शेख महंमद हनीफ रमजू राहणार-पीरबाबा चौक, नाशिक याच्याविरुद्ध वादवी कलम ३७६, ५०४, ५०६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती देवरे या पुढील तपास करीत आहे. मैत्रीच्या नावाखाली बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे.