शिवप्रहार न्युज - हरेगाव अत्याचारप्रकरणी युवराज गलांडेसह एकाला पोलिसांनी पकडले;उद्या श्रीरामपूर बंदचा निर्णय रद्द…

शिवप्रहार न्युज -  हरेगाव अत्याचारप्रकरणी युवराज गलांडेसह एकाला पोलिसांनी पकडले;उद्या श्रीरामपूर बंदचा निर्णय रद्द…

हरेगाव अत्याचारप्रकरणी युवराज गलांडेसह एकाला पोलिसांनी पकडले;उद्या श्रीरामपूर बंदचा निर्णय रद्द…

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ०४ तरुणांना झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करून,अमानवी वर्तणूक करुन ,त्यांच्या खुनाच्या प्रयत्नाची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. 

        या प्रकरणी पोलिसांनी युवराज नाना गलांडे व मनोज बोडके या दोघांना पुण्यातील वारजे भागातून ताब्यात घेतले आणि श्रीरामपुरात आणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करत त्यांना आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ०२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या वेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी झाली होती. यातील आरोपींपैकी दीपक गायकवाड व पप्पू पारखे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या ०४ झाली आहे.

        या प्रकरणातील अजून एक मुख्य आरोपी नाना गलांडे हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. RPI सह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हारेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलीस तपासाची सूत्रे वेगाने फिरत आहेत.

        युवराज गलांडे याच्यासह चार आरोपींना पकडण्यात आल्याने तसेच रक्षाबंधनचा सण असल्यामुळे उद्या 29 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेला श्रीरामपूर बंद मागे घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.