शिवप्रहार न्युज - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले हरेगावला भेट देणार…

शिवप्रहार न्युज -  केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले हरेगावला भेट देणार…

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले हरेगावला भेट देणार…

श्रीरामपूर- हरेगाव (ता.श्रीरामपूर) येथील दलित कुटूंबातील युवकांना अर्धनग्न करून आणि झाडाला उलटे टांगून, अमानुष मारहाण प्रकरणातील पीडित कुटुंबाची ०१ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले भेट घेऊन संवाद साधणार असल्याची माहिती आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.

     जिल्हाध्यक्ष थोरात यांनी सांगितले की, हरेगाव येथील पीडित कुटुंबाची भेट घेऊन ना.आठवले संवाद साधणार असून ०१ सप्टेंबर रोजी नगर जिल्हा दौऱ्यादरम्यान हरेगाव येथे उपस्थित राहणार आहेत.

      यावेळी संपर्कप्रमूख श्रीकांत भालेराव,विजय वाकचौरे ,बाळासाहेब गायकवाड, महेंद्र त्रिभवन, भीमा बागुल, सुभाष त्रिभूवन,पप्पू बनसोडे,सुनील शिरसाठ, विलास साळवे,आशिष शेळके, सुशील धहिजे,अनिल रणनवरे,विजय पवार, राजु गायकवाड, राजू मगर, संजय बोरगे,मनोज काळे, मोहन आव्हाड, सलीम शेख, विशाल सुरडकर, राजू गवांदे, करण कोळगे, धनू निकाळे आदीसह सर्व जिल्हा पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी ,सदस्य व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.