शिवप्रहार न्युज - IG व SP यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची जोरदार कामगिरी ! गावातून निघाली वाजत गाजत मिरवणूक !!
IG व SP यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची जोरदार कामगिरी ! गावातून निघाली वाजत गाजत मिरवणूक !!
नगर (शिवप्रहार न्यूज पोर्टल )-नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी .जी.शेखर पाटील व कर्तव्यदक्ष एस.पी.राकेश ओला यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार कामगिरी करत
आपल्या यशस्वी कारकीर्दीचा झेंडा फडकविला आहे . कारणही तसेच आहे शिर्डीत एकाच रात्री सासरा ,चुलत सासू ,पत्नी व अन्य अशा चौघांची धारदार चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.याचा तपास तातडीने स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला.
शिर्डी पोलीस यांनीही त्यात सहभाग घेत आरोपी जावई सुरेश निकम व चुलत भाऊ रोशन निकम या दोघांना काही तासात अटक केली तर श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे दरोड्याचा बनाव करून नवरा नईम पठाण याचा गळा आवळून खून करणारी त्याची पत्नी बुसरा पठाण हिचाही दरोड्याचा बनव उघडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेने कौतुकास्पद कामगिरी केली.त्यामुळे तालुक्यात दरोड्याच्या वृत्ताने घाबराट पसरलेली असतानाच पत्नीकडूनच हा खून झाल्याचे उघड झाल्याने जनतेनेही सुटकेचा निश्वास घेतला !
तिसरीकडे शेवगांव तालुक्यातील अमरापूर येथील प्रसिद्ध रेणुका माता मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिनेच चोरट्यांनी चोरून नेले होते.त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड तणाव संताप होता. एस.पी.श्री.राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर व त्यांच्या पथकाने रात्रंदिवस तपास करत आरोपी पकडले. तीन आरोपींकडून देवीच्या अंगावरील दागिने व सर्व मुद्देमाल असा एकूण ७लाख १९ हजाराचा ऐवजी हस्तगत केला.ग्रामस्थ व देवीचे भक्तगण इतके आनंदी झाले की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून, फटाकडे फोडून ,त्यांना फेटे बांधून ,त्यांना 51 हजार व 11000 ची रोख बक्षीस देऊ केले.मात्र पोनि आहेर यांनी ही बक्षिसाची रक्कम खेळाडू महिला पोलिसास देऊ केली.
ग्रामस्थांनी IG बी.जी.शेखर पाटील व एस.पी.राकेश ओला यांचे विशेष अभिनंदन केले.गेल्या आठ दिवसात या तीन कामगिरी बरोबरच सात गुन्ह्यातील फरार आरोपी दोन दिवसात पकडले. पंधरा वर्षापासून खुनात फरार असलेला आरोपी विष्णू पवळे याला अटक केली.अपघाताचा बनाव करून तीस लाखाचा लसूण चोरणाऱ्या दोघा परप्रांतीयांना पकडले. तोफखाना ,कोतवाली,नेवासा पोलीसात दाखल गुन्ह्यातील सात फरार आरोपी गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले ! दोन गावठी कट्यासह जिवंत काडतुस पकडून आरोपी शाहरुख शेख, राहणार -घोडेगाव याला जेरबंद केले.
एकंदरच IG बी.जी.शेखर पाटील व एस.पी राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेची दिलेली धुरा पोनि दिनेश आहेर यांनी सार्थ ठरवत धडाकेबाज कामगिरी सुरू केली आहे ! म्हणूनच पोलिसांची ही वाजत गाजत मिरवणूक काढण्याचा पहिला प्रकार काल नगर जिल्ह्यात नागरिकांना पाहायला मिळाला !पोलीस ही माणसच आहेत मात्र तेही राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर जबरदस्त कामगिरी करू शकतात हेच या आठ दिवसाच्या कामगिरीतून समोर येते असे म्हटले तर वावगे ठरू नये !