शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या इराणी गल्लीमध्ये आज कत्तलीसाठी आणलेल्या 14 गोवंशांना "शिवप्रहार"च्या मावळ्यांमुळे जीवनदान...
श्रीरामपूरच्या इराणी गल्लीमध्ये आज कत्तलीसाठी आणलेल्या 14 गोवंशांना "शिवप्रहार"च्या मावळ्यांमुळे जीवनदान...
श्रीरामपूर- शहरातील इराणी गल्लीतील श्रीरामपूर कोर्टाच्या समोरील एका पटांगणामध्ये 14 लहान गोवंशांना(गोर्हे व कालवड) कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आले होते.याची खबर आज रविवार दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शिवप्रहारचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर (चंदू)आगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन या गोवंशांची सुटका केली, शिवप्रहार चे मावळे आणि श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने या गोवंशांना ताब्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई चालू असून या गोवंशांना संगमनेर येथील गोशाळेत रवाना करण्यात येणार आहे. इराणी गल्लीमध्ये जाऊन १४ गोवंशांची सुटका करण्याची व त्यांना जीवनदान मिळण्याची ही श्रीरामपूर शहरातील पहिलीच घटना आहे. यावेळी श्रीरामपूर उपविभागाचे डीवायएसपी श्री. बसवराज शिवपुजे,भाजपाचे सरचिटणीस श्री.नितीनजी दिनकर,श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.हर्षवर्धन गवळी,श्रीरामपूर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख श्री.नागेशजी सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर(चंदू)आगे, इंजिनीयर प्रशांत भोसले,योगेश बोराडे/सोनार,सचिन रासकर,बंटी बाजारे,विशाल बोराडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.आपल्या गाय आणि मायचे रक्षण करणे ही शिवछत्रपतींची शिकवण आहे आणि त्या शिकवणीचे पालन या मावळ्यांनी केले त्याबद्दल शिवप्रहारच्या सर्व शिवभक्तांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.