शिवप्रहार न्युज - सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला...

शिवप्रहार न्युज -  सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला...

सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला...

   नगर (शिवप्रहार न्युज)- कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी 23 हजाराची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत विभागाने लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले आहे.

   पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथील 15 लाखाच्या सभामंडपाच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या संतोष बाळासाहेब जाधव, वय-39, रा-विद्या कॉलनी, कल्याण रोड, नगर याने महिला सरपंचांच्या पतीकडे 23 हजाराच्या लाचेची मागणी करत तडजोडीअंती लाचेची 22,500 रूपयांची रोख रक्कम स्वीकारताना त्याला काल लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, हरून शेख यांच्या पथकाने केली.

   सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 15 लाखांच्या कामाच्या वर्क ऑर्डर साठी 23 हजार रुपयांची मागणी होत असेल तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या वर्क ऑर्डर काढण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात लाच मागितली जात असेल हे या प्रकरणावरून दिसून येते.