शिवप्रहार न्युज - गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले पकडले; घेणाराही ताब्यात...
गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले पकडले; घेणाराही ताब्यात...
नगर (शिवप्रहार न्युज) - स्थानिक गुन्हे शाखेच्या व पारनेर पोलिसांच्या पथकाने पारनेरमध्ये कारवाई करत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कारही पोलिसांनी जप्त केली.
प्रमोद उर्फ अंकित किसनराव भस्के, वय-२८ रा. मरकळ, खेड, पुणे, दिपक गोविंदा पाटील, वयं-२३, चाकण, खेड पुणे, माऊली दादासाहेब भांबरे, वय-१९, आळंदी, खेड पुणे या तिघांना अटक करण्यात आली. प्रमोद भस्के याच्याकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळली. चौकशीमध्ये प्रमोद भस्के याने गावठी कट्टा पारनेरमध्ये विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. भस्के याने यापूर्वी रोहीत शिवाजी गवळी, जवळा, ता. पारनेर, याला गावठी कट्टा विकला होता. पोलिसांनी रोहीत गवळी याला अटक करुन त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केला होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद भस्के स्विफ्ट कारमधून पारनेरकडे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पारनेर पोलीस यांनी गव्हाणवाडी फाटा येथे सापळाल रचला. पोलिसांना पाहताच तिघेही गाडी सोडून पळू लागले होते. पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.