शिवप्रहार न्युज - जिल्ह्यातील अतिघाण रस्त्यावरील अपघात थांबेना...
जिल्ह्यातील अतिघाण रस्त्यावरील अपघात थांबेना...
राहुरी/श्रीरामपूर -नगर जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग असलेल्या नगर-मनमाड महामार्ग त्यावरील प्रचंड प्रमाणात असलेले खड्डे व धुळीच्या साम्राज्यामुळे अतिघाण या उपाधीने कुप्रसिद्ध झाला आहे.या महामार्गाचे काम गेल्या दशकापासून सुरू असून या महामार्ग वरील खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत.धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास देखील दशकापासून सहन करावा लागत आहे.
दरम्यान काल या कुप्रसिद्ध नगर-मनमाड महामार्गावर राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान एक भला मोठा माल वाहतुक ट्रक दुसऱ्या ट्रक ला धडकल्यामुळे मोठा अपघात झाला.त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली.माल वाहतुक ट्रकचा चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
तरी या कुप्रसिद्धीस पावलेल्या नगर-मनमाड महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? आणि नागरिकांचे जीव जायचे कधी थांबणार ? असा प्रत्येक नगर जिल्हा वाशियाच्या मनात प्रश्न निर्माण आहे.