शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर ची जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता...
श्रीरामपूर ची जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता...
श्रीरामपुर -श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच चालू आहे.परंतु अशी चर्चा आहे की,श्रीरामपूर विधानसभेची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जावू शकते अशी माहिती सुत्रांकडून देखील मिळत आहे.
श्रीरामपूरची जागा शिंदे गटाला गेल्यास माजी आमदार भाऊसाहेब कांबळे किंवा माजी खासदार चिरंजीव डॅाक्टर लोखंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.तसेच नितीन उदमले हे देखील भाजपसह शिंदेगटाकडून श्रीरामपूर विधानसभेसाठी इच्छुक आहे.