शिवप्रहार न्युज - कॉग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने नेहमीच बौद्ध समाजाचा कामापुरता वापर केला - राजाभाऊ कापसे
कॉग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने नेहमीच बौद्ध समाजाचा कामापुरता वापर केला - राजाभाऊ कापसे
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर मतदार संघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांचा नेहमीच कामापुरता वापर केला. राखीव मतदार संघ असतानाही स्थानिक बौध समाजाला उमेदवारी दिली नाही, केवळ सहानुभूती दाखवत दुजाभाव केला असा आरोप मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी स्थानिक नेत्यांवर केला आहे.
सध्या राजाभाऊ कापसे यांचा जोरदार प्रचार सुरु असून त्या संबंधी बोलतांना राजाभाऊ कापसे म्हणाले की, स्थानिक बौध समाजाचे अनेक इच्छुक लायक उमेदवार असतांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपवाल्यानी बाहेरुन उमेदवार आणले. हा समाजाचा घोर अपमान असून याचा बदल बैद्ध समाज एकसंघ होवून या विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहे असे सांगून राजाभाऊ कापसे म्हणाले की, श्रीरामपूर मतदार संघ राखीव ची ही शेवटची पंचवार्षिक निवडणूक आहे. आता तरी बौद्ध समाजाने एक व्हावे कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्याला एक व्हा, संघर्ष करा असा नारा दिला आहे. तेव्हा पाकीट, वर्गणी यासाठी स्वाभीमान गहाण ठेवू नका. तर सर्व बौद्ध माता-भगीनी, बंधूनी एक गठ्ठा मतदान करू मला संधी द्यावी, असे कळकळीचे आवाहन मनसे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी केले आहे.
श्रीरामपूरच्या नेत्यांचे अनेक 'कुटाने' मला माहीत असून ते मी श्रीरामपूर च्या जनतेला प्रचारादरम्यान सांगणार आहे असा इशाराही राजाभाऊ कापसे यांनी दिला. श्रीरामपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न मी प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पुढे बोलताना राजाभाऊ कापसे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी, बेरोजगांराना रोजगार देण्यासाठी मी काम करील. महिलांची सुरक्षा, पाणी प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, व्यापाऱ्यांच्या समस्या मी आमचे नेते राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे स्टाईलने सोडवणार असल्याचे सांगत आता बाहेरचा नाही तर स्थानिकच आमदार निवडूण द्या असे राजाभाऊ कापसे म्हणाले.