शिवप्रहार न्युज - प्रभात डेअरीजवळ जोडप्याला मारहाण...
प्रभात डेअरीजवळ जोडप्याला मारहाण...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)-पैशांच्या देण्या-घेण्यावरून एका जोडप्याला प्रभात डेअरीजवळ मारहाण करण्याचा प्रकार काल बुधवारी घडला आहे. याबाबत वर्षा सूरज बोरूडे, वय-२३, रा. कारेगाव या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, काल ११ वा. कोर्हाळे, ता. राहाता येथे कार्यक्रमासाठी मी व पती मोटारसायकलवर निघालो असता प्रभात डेअरीजवळ अभिजीत अहिल्याजी खैरे याने आम्हाला अडवले व पैशांच्या देण्या-घेण्यावरून त्याने लाथाबुक्क्यांनी मला व पतीला मारहाण केली. तसेच टोकदार वस्तू आपल्या कपाळाला मारल्याने आपण जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.