शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात चोरी; पहाटे एकाला रंगेहाथ पकडले...
श्रीरामपुरात चोरी; पहाटे एकाला रंगेहाथ पकडले...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील कुंभारगल्ली परिसरात पहाटेच्या सुमारास चोरी करताना एका मुलाला रंगेहाथ पकडले असून दुसरा मुलगा पळून गेला आहे. कुंभारगल्ली येथे राहणारे सुधीर रामकृष्ण लोळगे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये घुसून काल सोमवार दि.९ डिसेंबर रोजी पहाटे ५ च्या दरम्यान सागर आणि एका अज्ञात मुलाने उचकापाचक करून २ हजार रूपयांची रोकड चोरली. लोळगे यांना पहाटे घराच्या गेटचा आवाज आल्याने त्यांनी शेजारी राहणारे ॲड. सुहास चुडीवाल यांना कळवले. त्यानंतर पोलिसांना बोलावून गच्चीवर शोध घेतला असता तेथे पोलीसांना सागर नावाचा मुलगा मिळून आला असून त्याच्याबरोबरचा आणखी एक मुलगा गच्चीवरून उडी मारून पळून गेला आहे.
याप्रकरणी लोळगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे.पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे हे करीत आहेत.