शिवप्रहार न्युज - ०५ वर्षीय चिमुरड्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला...

शिवप्रहार न्युज -  ०५ वर्षीय चिमुरड्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला...

०५ वर्षीय चिमुरड्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला...

राहुरी(प्रतिनिधी)

   राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री.संत महपती महाराज मंदिर परिसरात एका ०५ वर्षीय चिमुरड्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडताच त्याच्या वडीलांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेत बिबट्याच्या जबड्यातून आपल्या मुलाला ओढल्याने तो चिमुरडा बालंबाल बचवावल्याची थरारक घटना घडली आहे. 

      रूद्र सचिन गागरे (वय ५ वर्षे) असे जखमी चिमुरड्याचे नाव असुन पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयास दाखल करण्यात आले आहे.

   अधिक समजलेली माहीती अशी की, काल रविवारी सायंकाळी सहा वाजेच्यादरम्यान सचिन गागरे हे आठवडे बाजार करून आपल्या घरी जात असताना वडिलांची मोटरसायकल दारात येताना बघताच त्यांचा ०५ वर्षाचा रूद्र त्यांच्या दिशेने पळत निघाला.माञ घराबाहेरीलच एका झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट त्या रूद्रावर हल्ला चढविला बापाच्या डोळ्यासमोर हि थरारक घटना बघताच त्या बापाने कशाचाही विचार न करता थेट बिबट्याच्या दिशेने धाव घेत मुलाला त्या बिबट्याच्या जबड्यातून ओढले व दगडाने बिबट्यावर प्रतिहल्ला केला.तोच बिबट्याने तेथुन धूम ठोकली. माञ सदर घटनेमधे हा पाच वर्षीय रूद्र जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी वन विभागाच्या अधिका-यांनी भेट दिली असुन पिंजरा देखील लावण्यात आला आहे.

चिमुरड्याच्या बापाचे होतेय कौतुक!

आपल्या पोटच्या लेकरावर आपल्यासमोर एखादी घटना घडतेय आणि बाप लेकरासाठी काहीच करत नाही असे कधी होत नाही. असाच एक प्रसंग ताहाराबाद येथील चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला आणि पुढे होणाऱ्या अनर्थचा कोणताही विचार न करता बापाने थेट आपल्या चिमूरड्याला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढून त्याचा जीव वाचविला. त्यामुळे या बापाच्या शौर्यावर ताहाराबाद गावासह तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.