शिवप्रहार न्युज - विकास लष्करे यांची बजरंग दल शहर संयोजकपदी निवड…

शिवप्रहार न्युज -  विकास लष्करे यांची बजरंग दल शहर संयोजकपदी निवड…

विकास लष्करे यांची बजरंग दल शहर संयोजकपदी निवड…

नेवासा – येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते विकास लष्करे यांची बजरंग दलाच्या नेवासे शहर संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. रविवारी बाभळेश्वर येथील नारायणगिरी महाराज आश्रम येथे आहिल्यानगर जिल्ह्याची आगामी काळात विश्व हिंन्दु परिषद,बजरंगदल संघटना मजबुत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विश्व हिंन्दु परिषदेचे प्रान्त सहमंत्री सतीश गोर्डे यांनी विकास लष्करें यांच्या निवडीची घोषणा केली.

          यावेळी विकास लष्करे म्हणाले की,माझ्यावर संघटनेची आज मोठी जबादारी देण्यात आली.मी या पदाच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल व संघटना मजुबत करण्यासाठी प्रयत्नशील राहील.लष्करे यांच्या निवडीबद्दल विश्व हिंन्दु परिषदेचे विभाग मंत्री सुनिल खिस्ति, जिल्हामंत्री विशाल वाकचौरे, जिल्हासंयोजक शुभम मुर्तडक, जिल्हानिधी प्रमुख प्रशांत बहिरट व श्रीराम राज्य उत्सव समिती नेवासे तालुका यांनी अभिनंदन केले आहे.