शिवप्रहार न्युज - ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 37 व्या अल्पवयीन मुलीचा शोध व सुटका करून आरोपी अटकेत…
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 37 व्या अल्पवयीन मुलीचा शोध व सुटका करून आरोपी अटकेत…
राहुरी - राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 1241/2024 BNS 137(2), प्रमाणे दिनांक 29/11/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेवुन आज रोजी तिची सुटका करून तिला राहुरी पोलीस स्टेशनला आणून तिचा सविस्तर जबाब नोंदवून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपी ऋतिक दिलीप धोत्रे,राहणार- देवळाली प्रवरा,तालुका राहुरी यास अटक करण्यात आली. आरोपीकडे विचारपूस करून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करत आहेत.
दरम्यान पोलीसांच्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सन 2016 मध्ये अपहरण झालेली एक मुलगी, सन 2021 मध्ये अपहरण झालेल्या 2 मुली, सन 2022 मध्ये अपहरण झालेली एक मुलगी, सन 2023 मध्ये अपहरण झालेल्या 5 अल्पवयीन मुली तसेच सन 2024 मध्ये अपहरण झालेले एकूण 23 मुली व 5 मुले असे एकूण 37अपहरित बालकांचा(32मुली व 5 मुले ) जानेवारी 2024 पासून शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देवून अपहरण करणाऱ्या 37 आरोपींना अटक करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक,नगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे ,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर,श्री. डॉ.बसवराज शिवपुजे,उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर उपविभाग,जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोसई धर्मराज पाटील, पोहे का राहुल यादव, अशोक शिंदे,पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. शेषराव कुटे, मपोहेकॉ. स्वाती कोळेकर मपोकॉ. वृषाली कुसळकर नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.नगर व पो.ना.सचिन धनाड, पो.ना.संतोष दरेकर, पो.ना.रामेश्वर वेताळ नेमणुक,अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपुर मोबाईल सेल यांनी केली आहे.