शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात आज पुन्हा उसाचा ट्रक पलटी…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात आज पुन्हा उसाचा ट्रक पलटी…

श्रीरामपुरात आज पुन्हा उसाचा ट्रक पलटी…

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरात उसाची ट्राली पलटी होऊन ट्रॅफीक जाम होण्याची घटना ०३ दिवसांपूर्वी घडली होती.त्यानंतर आज रविवारी पुन्हा एकदा श्रीरामपूर शहरातील अशोक नगर फाटा इच्छामणी मंगल कार्यालय समोर असणाऱ्या टर्न वर एक उसाचा ट्रक पलटी झालेल्या स्थितीत आढळून आला.या ट्रकचा नंबर एम.एच.१७ सी ५७४४ असा असून यामुळे ट्रक मधील ऊस सर्वत्र सांडलेला दिसत होता. 

      या घटनेत कोणीही गंभीर जखमी नसल्याचे समजते. दरम्यान ओव्हर लोडिंगमुळे उसाचे ट्रक पलटी होत असल्याची चर्चा जाणकारांमध्ये चालू आहे.