शिवप्रहार न्युज - अल्पवयीन मुलीवर विवाहीत तरुणाचा बलात्कार! बायकोने केले मोबाईल शुटींग!!
अल्पवयीन मुलीवर विवाहीत तरुणाचा बलात्कार! बायकोने केले मोबाईल शुटींग!!
अहिल्यानगर ( शिवप्रहार न्युज) - नगर शहरात राहणाऱ्या एका गरीब अल्पवयीन मुलीचे एका मुलाबरोबरचे मैत्रीचे संबंध आहे,ते मी तुझ्या घरच्याला सांगेन,तुझी बदनामी करील अशी भिती दाखवुन,धमकावून लिंगपिसाट विवाहीत तरुण सिध्देश संजय भस्मे याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
तसेच त्याने तिला घरी नेवून बलात्कार केला.तेव्हा सिध्देश भस्मे याची बायको राणी सिध्देश भस्मे हिने नवरा त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करतांनाचे मोबाईलमध्ये शुटींग केले व व्हायरल करील असे म्हणत तिनेही धमकी दिली.
याप्रकरणी पिडीत तरुणीने कोतवाली पोलीसात फिर्याद दिल्यावरून लिंगपिसाट भस्मे व त्याची बायको यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून दोघा नवरा - बायकोला पोलीसांनी अटक केली आहे. डीवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे. या घटनेने नगर शहरात खळबळ उडाली आहे .