शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात मसाज करायला बोलावून वेश्या व्यवसाय करायला लावला…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात मसाज करायला बोलावून वेश्या व्यवसाय करायला लावला…

श्रीरामपुरात मसाज करायला बोलावून वेश्या व्यवसाय करायला लावला…

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर ०१ परिसरामध्ये एका कॉलनी मधील घरात तरुणींना मसाज करायला बोलावून त्यांच्याकडून देह विक्री करून घेण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलिसांना आदेशित करून त्या ठिकाणी रेड केली.यामध्ये वृंदा टी. नामक महिला ही ०२ तरुणींना मसाज करता बोलावून, त्यांच्याकडे गिऱ्हाईक पाठवून त्यांना वेश्याव्यवसाय धंदा करायला लावताना व त्या बदल्यात पैसे घेतांना मिळून आली. 

       या प्रकरणी पोलिसांनी ०२ पिडित तरुणींची सुटका करून महिला आरोपी वृंदा टी. हिच्या विरोधात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री.शेलार यांच्या तक्रारीवरून अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहे.या महिलेने अजून कोणाला अशा प्रकारे धंद्याला लावले ? त्या प्रकारात शहरातील कोणते तरुण,युवक बळी पडले ? याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान यातील एक पिडीत तरुणी हि एका प्रतिष्ठीत व्यक्तीशी संबंधीत असून तिने कोणत्या इतर ' प्रतिष्ठित ' व्यक्तींना तरुणी पुरविल्या का ? याची आंबट शौकीनांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे. सदर पीडितेच्या पतींना ही गोष्ट माहीत होती किंवा नाही ? हे समजू शकले नाही. या प्रकाराने श्रीरामपुरात एका घरात अनैतिक कृत्य होत होते हे उघड झाले आहे.