शिवप्रहार न्युज - नेवासा शहरामधील कत्तलखान्यावर कारवाई ;9 जणांवर गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्युज -  नेवासा शहरामधील कत्तलखान्यावर कारवाई ;9 जणांवर गुन्हा दाखल…

नेवासा शहरामधील कत्तलखान्यावर कारवाई ;9 जणांवर गुन्हा दाखल…

नेवासा/नगर- श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

 नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, रविंद्र घुंगासे, रमीजराजा आत्तार, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन सुचना देऊन पथकास रवाना केले. 

 दिनांक 02/01/2025 रोजी पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेंडे गल्ली भरावाजवळ काटवनात, नेवासा येथे नदीम सत्तार चौधरी व इतर इसमांनी गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने डांबुन ठेवलेले आहेत.तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता काटवनामध्ये गोवंशीय जनावरे डांबुन ठेवल्याचे दिसुन आले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना येताना पाहुन संशयीत इसम पळून गेले. आसपासचे नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांची नावे 1) नदीम सत्तार चौधरी 2) फिरोज अन्सार देशमुख 3) शोएब अलीम खाटीक 4) खलील उस्मान चौधरी 5) अबु शाहाबुद्दीन चौधरी 6) मोजी अबु चौधरी 7) जबी लतीफ चौधरी 8) अन्सार सत्तार चौधरी व 9) अकील जाफर चौधरी सर्व रा.नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द, ता.नेवासा असे असल्याचे सांगीतले. 

        पथकाने घटनाठिकाणावरून 13,40,000/-रू किं. त्यात 17 गायी, 6 गोवंशीय कालवडी व 4 गोवंशीय गोऱ्हे असा मुद्देमाल जप्त केला आहे. वर नमूद 09 आरोपीविरूध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 07/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ),9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे , अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.