शिवप्रहार न्युज - दुचाकीच्या सिटवर ठेवलेला वनप्लस मोबाईल ०२ चोरट्यांनी पळवला...

दुचाकीच्या सिटवर ठेवलेला वनप्लस मोबाईल ०२ चोरट्यांनी पळवला...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - गाडीच्या डिक्कीतून सामान काढत असताना सिटवर ठेवलेला मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार खैरनिमगावमध्ये घडला आहे.
खैरी निमगाव येथे राहणारा तरूण पार्थ कैलास शेजूळ हा दि. १० मार्च रोजी रात्री ९.३० वा. खैरीनिमगाव येथील श्रीरामपूर-पुणतांबा रोडवर आपल्या गाडीच्या डिक्कीतून सामान काढत होता. तेव्हा त्याने आपला वन प्लस कंपनीचा मोबाईल स्कुटीच्या सिटवर ठेवलेला असताना अज्ञात दोन चोरटयांनी दुचाकीवर त्याच्या पाठीमागून येवून सिटवर ठेवलेला मोबाईल पळवून नेत धूम ठोकली.
याप्रकरणी पार्थ शेजूळ या तरूणाने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात दोघा मोबाईल चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. ढोकणे हे करीत आहेत