शिवप्रहार न्युज - ०३ मोटारसायकल व ०३ मोबाईल सराईत चोरट्याकडून जप्त…

०३ मोटारसायकल व ०३ मोबाईल सराईत चोरट्याकडून जप्त…
श्रीरामपूर- याबाबत अधिक माहिती अशी कि,दिनांक 01/03/2025 रोजी सकाळी 09/00 ते दुपारी 03/30 वा. चे दरम्यान फिर्यादी श्रीराम ज्ञानदेव जगताप, वय 31 वर्षे, धंदा-शिक्षक, (कॅम्ब्रेज इंटरनॅशनल स्कुल शिरसगाव) रा. नांदुर बु.अस्तगाव रोड, ता. राहता जि. अहिल्यानगर यांची कॅम्ब्रेज इंटरनॅशनल स्कुल शिरसगाव ता. श्रीरामपूर येथे पार्किंगमध्ये लावलेली MH-14, BE- 7632 या नंबरची सिल्व्हर रंगाची बजाज प्लॅटीना मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता लबाडीच्या इरादयाने चोरी करुन नेली वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 227/2025 बी.एन.एस. कलम 305 (ब) प्रमाणे दिनांक 03/03/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल होताच मा. पोनि. नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्हयातील मोटारसायकलचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ सदर गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाची पाहणी व तांत्रिक विश्लेषन केले असता सदरचा गुन्हा सराईत आरोपी नामे ज्ञानेश्वर संताराम मोरे, वय 21 वर्षे, रा. इंद्रानगर, भोकर ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर याने केला असल्याचे निष्पण झाल्याने सदर आरोपीताच शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदरचा आरोपी हा गोंधवणी पाण्याची टाकी वॉर्ड नं.01 श्रीरामपूर येथे आला आहे. अशी माहिती मिळाल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेत असतांना त्याला तपास पथकाची चाहुल लागताच तो पळून जावु लागला असता त्यास तपास पथकाने पाठलाग करुन पकडले. त्यास ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने श्रीरामपूर शहर तसेच इतर ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन एक टिव्हीएस व्हिक्टर एक स्प्लेंडर, एक बजाज प्लेटिना गाड्या व विविध कंपन्यांच्या ०३ मोबाईल असा ०२ लाख ६५ हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोहेकॉ संतोष परदेशी, पोकों/अमोल पडोळे, पोकों/संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/ अमोल गायकवाड, पोकों/आजिनाथ आंधळे, पोकों/सांगर बनसोडे, पोकों/शिवाजी बडे, पोकों/ रामेश्वर तारडे, पोकॉ/ प्रविण कांबळे, मपोकों/ मिरा सरग यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संतोष परदेशी हे करीत आहेत.