शिवप्रहार न्युज - पत्नीच्या अंत्यविधीनंतर लगेच पतीचे निधन…

पत्नीच्या अंत्यविधीनंतर लगेच पतीचे निधन…
राहुरी - राहुरी तालुक्यातील म्हैसगाव या गावातील श्रीमती साखरबाई रामभाऊ मुसळे यांचे अल्पशा आजाराने उपचार सुरु असताना निधन झाले. काल दुपारी बारा वाजताच्या सुमारास म्हैसगाव येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.त्यानंतर काही तासातच त्यांचे पती रामभाऊ एकनाथ मुसळे यांनी देखील अखेरचा श्वास घेतला.
या दोन्ही घटनांमुळे मुसळे परिवारावर दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर कोसळला आहे. मुसळे पती-पत्नी यांच्या पश्चात मोठा परिवार म्हैसगाव येथे त्यांचा आहे.या घटनेने म्हैसगाव पंचक्रोशीत प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.