शिवप्रहार न्युज - रेल्वे पोलीसाचा श्रीरामपुरात तरुणीवर बलात्कार; खळबळ...

रेल्वे पोलीसाचा श्रीरामपुरात तरुणीवर बलात्कार; खळबळ...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरात मध्य वस्तीत वार्ड नं.५ भागात एका इमारतीच्या तळ मजल्याच्या खोलीत भर दुपारी २ ते ३ च्या सुमारास एका ३१ वर्षाच्या तरुणीवर आरोपी ज्ञानदेव आढाव याने नोकरीचे अमिष दाखवून बलात्कार केला.
आरोपी ज्ञानदेव आढाव हा रेल्वे पोलीसात नोकरीला असून त्याने पिडीत तरुणीला विश्वासात घेवून,तिचा मोबाईल नंबर घेत त्यावर वेळोवेळी मेसेज करून तुला नोकरी लावून देतो, असे म्हणत बलात्कार केला. पिडीता राहुरी तालुक्यातील असून तिने श्रीरामपूर शहर पोलीसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी ज्ञानदेव आढाव याच्य विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांसह अनुसुचित जातीजमाती संरक्षण कायद्यान्वये बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी डीवायएसपी शिवपुंजे हे पुढील तपास करत असून डीवायएसपी शिवपुंजे व पोनि.नितिन देशमुख यांनी घटना स्थळी भेट दिली. दरम्यान रेल्वे पोलीसानेच तरुणीवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे.