शिवप्रहार न्युज - ०८ सराईत ०२ वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार...

शिवप्रहार न्युज -  ०८ सराईत ०२ वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार...

०८ सराईत ०२ वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार...

नेवासा- महाराष्ट्रात राज्य सरकारने गो-हत्येस बंदी घालून देखील वारंवार गो-हत्या करणाऱ्या नेवासा येथील ०८ सराईत गुन्हेगारांना अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला, यांनी दोन वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

     याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नेवासा येथील 1. नदीम सत्तार चौधरी, 2. फिरोज अन्सार देशमुख,3. शोएब अलीम खाटीक,4. अबू शाबुद्दीन चौधरी, 5. मोजी अबू चौधरी,6. जबी लतीफ चौधरी,7. अन्सार सत्तार चौधरी, 8. अकील जाफर चौधरी सर्व रा. नायकोडी मोहल्ला ता. नेवासा यांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे.या सराईत गुन्हेगारांवर गो-हत्या बंदी कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल असल्याने हि कारवाई करण्यात आली.या कारवाईचे सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.