शिवप्रहार न्युज - २३ वर्षांची रविना शिंदे झाली उक्कलगावची सरपंच…
२३ वर्षांची रविना शिंदे झाली उक्कलगावची सरपंच…
श्रीरामपूर- दिनांक ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रात जवळजवळ साडेतीन ते पावणे चार हजार ग्रामपंचायतीची निवडणूक झाली असून सहा तारखेला सरपंचपद तसेच ग्रामपंचायत मेंबर्स यांचा निकाल लागला असून जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने दावे करतो आहे की,आमच्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा आले आहेत.खरं काय खोटं माहीत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चुरशीची आणि निर्णय निवडणूक होऊन सर्व महाराष्ट्राचे लक्ष त्या ग्रामपंचायतने वेधून घेतले आहे.त्याला कारणही तसेच आहे कारण त्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वयाची मुलगी ही सरपंच पदासाठी उभे होती आणि ती सुद्धा एक चांगल्या धुरंधर राजकीय नेत्याच्या पॅनलच्या विरोधात ते ठिकाण आहे श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव. उक्कलगाव हे अतिशय राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव समजले जाते त्यात सरळ-सरळ लढत हरिहर एकता आघाडी विरुद्ध समाजसेवा मंडळ उक्कलगाव अशी झाली होती.त्यात समाजसेवा मंडळाचे नेतृत्व श्री.इंद्रनाथ पाटील थोरात तर हरिहर विकास मंडळाचे नेतृत्व श्री. आबासाहेब थोरात हे करत होते.त्या निवडणुकीत कुमारी रवीना तुळशीराम शिंदे,ही २३ वर्षे वयाची मुलगी निवडून येऊन गावची कारभारीन म्हणजेच प्रथम नागरिक सरपंच झाली आहे.ती मुलगी स्वतः सुशिक्षित असून एम कॉम उच्चशिक्षित आहे.तिचे वय हे अतिशय अल्प असून ती सरपंच झाली आहे.गावच्या सुज्ञ ग्रामस्थांनी अतिशय तरुण व अल्पवयीन मुलीच्या हातात कारभार दिला असून भविष्यात ती गावाचा कारभार कशा पद्धतीने चालवते याकडे गावाचे लक्ष निश्चितच लागलेले आहे.
जास्तीत जास्त तरुण तरुणींच्या हातामध्ये देश निश्चितच द्यावा असं निवडून आलेल्या सरपंच कुमारी रवीना शिंदे यांचे म्हणणं आहे.रवीना शिंदे या अतिशय गरिबी परिस्थितीतून असून गावच्या ग्रामस्थांनी भरभरून मत देऊन पूर्ण प्रेम देऊन गावाने त्यांना निवडून आणून गावचे कारभारीन केले आहे.तरी बघूया भविष्यात या गावची कारभारीण उच्चशिक्षित व राजकारणात सर्वात कमी वयाची मुलगी ही कशा पद्धतीने गावाच्या कारभार करते आहे.याकडे संपूर्ण जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे.