शिवप्रहार न्युज - ०५ मिनटात पैशे डबल करणाऱ्या टोळीला ०५ लाखांसह लोणी पोलीसांनी पकडले…

शिवप्रहार न्युज - ०५ मिनटात पैशे डबल करणाऱ्या टोळीला ०५ लाखांसह लोणी पोलीसांनी पकडले…

०५ मिनटात पैशे डबल करणाऱ्या टोळीला ०५ लाखांसह लोणी पोलीसांनी पकडले…

लोणी-राहता तालुक्यातील लोणी येथील प्रिंन्स कॉर्नर चौकात दि. २६/०५/२०२३ रोजी तक्रारदार नामे बाबासाहेब वसंत सुर्यवंशी वय ४० रा.बळेगाव ता वैजापुर, जि संभाजीनगर यांना शिंदे असे खोटे नाव असलेले इसमाने त्यांना पाच मिनीटात पैसे डबल करुन देण्याचे व खऱ्या नोटा देण्याचे आमीष दाखवुन त्यांना लोणी येथे बोलावुन घेऊन त्यांचेकडुन नऊ लाख पन्नास हजार रुपये घेऊन हातचलाखीने त्यांना रददी पेपर असलेले बॅग देऊन त्यांची फसवणुक केल्याची तक्रार त्यांनी दिलेवरुन लोणी पोलीस स्टेशनला गुर नं २९९ / २०२३ भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे दि २७/०५/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

      सदर गुन्हा दाखल झालेनंतर एकमात्र पुरावा म्हणुन आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला होता. तो पण चोरी केलेले मोबाईल मधील नंबर होता. तसेच सी सी टी व्ही फुटेज पण मिळाले होते परंतु आरोपी अनोळखी होता. त्यामुळे आरोपी निष्पण करणे अवघड झाले होते. परंतु मा अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांनी दिलेल्या सुचना व मागदर्शनाखाली सपोनि आठरे यांनी स्वतंत्ररित्या पोसई शिंदे, पोहेकॉ / १२०३ जोसेफ साळवी, पोहेकॉ / १२२ मधुसूदन दहिफळे, पो ना / १३२६ सय्यद , पोहेकॉ / १९४२ सुर्यभान पवार यांचे पथक तयार करुन पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन गोपनीय बातमीदार तयार करुन तपास केला असता आरोपी नामे १) जितेंद्र ममता साठे वय ३६ रा वासुंदे ता. पारनेर जि अहमदनगर (शिंदे असे खोटे नाव असलेला इसम ) यानेच सदरचा गुन्हा केल्याचे निष्पण्ण झालेले असुन त्याचे साथीदार २) अरुण सुरेश शिंदे वय २४ रा वरवंडी फाटा, वरवंडी ता संगमनेर. ३) अन्वर अब्दुलखॉ पठाण वय ४८ रा. केशवनगर श्रीकृपा सोसायटी, जुने ऑरवीज स्कुल, प्लॅट नं १०१ बालाजी सुपर शॉपी शेजारी, मुंढवा पुणे मु रा. नांदर, ता पैठण यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पण झालेले असुन सदर गुन्हयातील आरोपी यांचेकडुन फिर्यादी यांचे गेले मालापैकी पाच लाख रुपये जप्त केले असुन गुन्हयाचे कामी वापरलेल्या दोन मोटार सायकल, दोन मोबाईल हॅण्डसेट तसेच तीन सिमकार्ड जप्त केलेले आहेत. 

      आरोपी जितेंद्र ममता साठे हा गुन्हा करुन बरेच दिवस स्वतःचे आस्तीत्व लपवुन फिरत होता.तसेच तो अशा प्रकारचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे तो वेळोवेळी त्याचे लोकेशन बदलुन आस्तीत्व लपवुन फिरत होता. तपास पथकातील पोसई शिंदे, पोहेकॉ / साळवी, पोहेकॉ दहिफळे व पांना सय्यद यांनी बातमीदार तयार करुन त्याचे ठिकाण्याबाबत माहीती घेऊन त्यास सदर गुन्हयात रात्रीचे वेळी सविंदणे ता शिरुर येथे ताब्यात घेतले असुन इतर आरोपी सुध्दा त्यांचे मोबाईल बंद करुन राहत होते. त्यांचे बाबत सुध्द माहीती काढुन त्यांचे अटकेसाठी अटोकाट प्रयत्न करुन सदर आरोपी यांना गुन्हयात अटक करुन फसवणुक करणारी टोळी जेरबंद केली आहे. आरोपी नामे जितेंद्र ममता साठे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द १) आळेफाटा पोलीस स्टेशन जि पुणे गुर नं २८६ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे २) नारायणगाव पो.स्टे. जि पुणे

गुरनं २४३ / २०१२ भादवि कलम ४८९, ४८९ (ब), ४८९ (क), ३४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 

      सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर स्वाती भोर मॅडम तसेच, मा उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि युवराज आठरे, पोसई योगेश शिंदे, पोहेकॉ / जोसेफ साळवी, पोहेकॉ / मधुसूदन दहिफळे पोना / आसीर सय्यद, पोहेकॉ / सुर्यभान पवार, होमगार्ड गफरान शेख, अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पो.ना/ प्रमोद जाधव, पोकॉ. आकाश बहिरट व पोकॉ सचिन धनाड यांनी केली आहे.