शिवप्रहार न्युज - पत्रकार रामराजे शिंदे यांच्यावर हल्ला करण्याला अटक करून कठोर कारवाई करावी….
पत्रकार रामराजे शिंदे यांच्यावर हल्ला करण्याला अटक करून कठोर कारवाई करावी….
नगर -मौजे मढी ता.पाथर्डी येथे वैदू समाजाची मेळावा होणार असल्या कारणाने 11 मार्च रोजी वैदूवाडी शेजारी प्रियदर्शनी कॉलनी दत्त मंदिर येथे वैदु समाजाची नियोजन बैठक चालू असतांना सिंकदर बाबाजी शिंदे यांनी लोकराज्य बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व अहमदनगर परिवर्तन साप्ताहिक चे संपादक रामराजे शिंदे यांना लाकडाच्या दांडक्यानी पाठीमागून येऊन डाव्या खांदयावर जबर हल्ला केला.व मला असे म्हणाला की,परत कुठे दिसला तर तुझ्या भावाचा खून केला तसच तुझा पण खून करीन.अशी खुनाची धमकी दिली आहे.या हल्ला संदर्भात तोफखाना पोलिस स्टेशन येथे रामराजे शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
सिकंदर शिंदे याला तात्काळ पत्रकार हल्ला कायदयानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी.याबाबतचे निवेदन लोकराज्य बहुजन पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले आहे.तसेच सिंकदर बाबाजी शिंदे यांच्याकडून माझ्या कुटुंब्यांना जिवास धोका निर्माण झाला आहे.व माझ्या कुटुंब्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे.व माझ्या कुटुंबाला उदया काही आरोपी सिकंदर बाबाजी शिंदे यांच्या कडून काही कमी जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.व त्याच्यावर कायदेशीर करवाई न केल्यास पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर लोकराज्य बहुजन पत्रकार संघाकडून येत्या ८ दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल.असा इशारा लोकराज्य बहुजन पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रामराजे शिंदे यांनी दिला आहे.