शिवप्रहार न्युज - १० वी चा पेपर देण्यासाठी गेलेल्या मुलीला पळवले; मुख्याध्यापकाने विचारणा केल्यावर आईला कळाले...

शिवप्रहार न्युज -  १० वी चा पेपर देण्यासाठी गेलेल्या मुलीला पळवले; मुख्याध्यापकाने विचारणा केल्यावर आईला कळाले...

१० वी चा पेपर देण्यासाठी गेलेल्या मुलीला पळवले; मुख्याध्यापकाने विचारणा केल्यावर आईला कळाले...

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूरमधील दत्तनगर परिसरात राहणारी मुलगी १०वीचा पेपर देण्यासाठी गेली असता तिला पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. 

      याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तनगर परिसरात राहणारी १०वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी नेवासा तालुक्यातील एका ठिकाणी शिक्षण घेत होती. १०वीचे पेपर असल्याने ती श्रीरामपूर येथून सकाळी नेवासा येथे जाण्यासाठी बसने गेली असता तिला कोणीतरी अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले आहे. मुलगी शिकत असलेल्या शाळेमधील मुख्याध्याकांनी मुलीच्या आईला फोन करून तुमची मुलगी १० वीच्या पेपरला का आली नाही? असे विचारल्याने हा प्रकार उघड झाला. 

     याप्रकरणी मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.