शिवप्रहार न्युज - राजाराणी चित्रपटात पोलीस अधिकारी संपतराव शिंदेंची कन्या वैष्णवी प्रमुख भुमिकेत! श्रीरामपूरात गर्दी!!
राजाराणी चित्रपटात पोलीस अधिकारी संपतराव शिंदेंची कन्या वैष्णवी प्रमुख भुमिकेत! श्रीरामपूरात गर्दी!!
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरिक्षक म्हणून कर्तव्य बजावलेले व आता संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस कमिशनर म्हणून रूजू असलेले संपतराव शिंदे यांची कन्या वैष्णवी संपतराव शिंदे हीने राजाराणी या मराठी चित्रपटात हिरोईनची मुख्य भुमिका केलेली आहे . हा चित्रपट १८ ऑक्टोंबर पासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून हिरोच्या भुमिकी रोहण पाटील हा आहे . तर बिगबॉस विजेता सुरज चव्हाण याचीही महत्व पूर्ण भुमिका या चित्रपटात आहे.
सत्य घटनेवर आधारीत ही थरारक प्रेम कथा असून श्रीरामपूरात व सर्वत्र राजाराणी हा चित्रपट गर्दी खेचत आहे . त्यात आपल्या जिल्हयाचे संपतराव शिंदे यांची कन्या वैष्णवी ही प्रमुख भुमिकेत असल्याने त्याचा सर्वांनाच मोठा अभिमान आहे . कारण चित्रपट क्षेत्रात प्रमुख भुमिकेत रोल करणे हे मोठे कौतुकास्पद आहे .