शिवप्रहार न्युज - माजी मंत्री ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन…
माजी मंत्री ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन…
अहिल्यानगर : अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं नाशिक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मधुकरराव पिचड यांनी अनेक महत्त्वाची राजकीय पदं सांभाळली आहेत. आदिवासी समाजातील कार्यकर्ते आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती.
राज्य सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही अनेक वर्षे काम केलं आहे.मधुकर पिचड यांनी १९८० ते २००९ पर्यंत नगर जिल्ह्यातील (आताचा अहिल्यानगर) अकोले विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. तर मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.