शिवप्रहार न्युज - उपसरपंच सौ.सारिका जाधव यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर...
उपसरपंच सौ.सारिका जाधव यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर...
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर कारखान्याच्या परिसराच्या भागातील निपाणी वडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ.सारिका जाधव यांच्यावर तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव मांडण्यात आला.त्यामध्ये त्यांच्या विरोधात पदाचा दुरुपयोग करणे,इतर सदस्यांना विश्वासात न घेणे इ. यासारखे आरोप ठेवण्यात आले.हा ठराव 15 विरुद्ध 02 असा तहसीलदार यांनी मंजूर केला आहे.
दरम्यान उपसरपंच सौ.सारिका जाधव यांच्या वतीने देखील तहसीलदार यांच्याकडे या ठरावाच्या विरोधात हरकत घेण्यात आली आहे.हा ठराव बेकायदेशीर असल्याचे त्यांनी त्यांच्या हरकत अर्जामध्ये म्हटले आहे.