शिवप्रहार न्युज - एक सरपंच हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा तालुकाभर बोभाटा...
एक सरपंच हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा तालुकाभर बोभाटा...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील एका मोठ्या गावचे सरपंच हे 'हनीट्रॅप'मध्ये अडकल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू असून सदर प्रकरण मिटवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गावपातळीवर बैठकांवर बैठका सुरू असल्याने आता त्याची वाच्यता बाहेर झाल्याने या चर्चेला उधाण आले आहे.थोडक्यात तालुकाभर एक सरपंच हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा बोभाटा सुरु झाला आहे.
प्रकरण गावपातळीवर मिटले नाही तर या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.