शिवप्रहार न्युज - श्रीदत्त जयंतीनिमित्त बजरंगनगर येथे महाप्रसाद!
श्रीदत्त जयंतीनिमित्त बजरंगनगर येथे महाप्रसाद!
श्रीरामपूर ( शिवप्रहारन्यूज ) श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.०७ बेलापूररोड येथील बजरंगनगरमध्ये असलेल्या श्री.नागराज दत्त मंदिर येथे सालाबादप्रमाणे श्री.दत्त जयंती उत्सव साजरा होणार असून श्री.दत्त देवतेचा जन्मोत्सव व महाआरती सायंकाळी ०६ वाजता होणार आहे. त्यानंतर लगेचच महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.
१७ वर्षापूर्वी गुरुवारच्या दिवशी येथील श्री.दत्त मुर्तीवर सायंकाळी जीवंत नागराज प्रकट झाले होते व श्री.दत्त मुर्तीचे बरोबर ब्रम्हा विष्णू च्या बाजुला शिवजीच्या मुर्तीच्या डोक्यावर फणा काढून नाग सुमारे तासभर दर्शन देत होता.तेव्हा हजारो भाविकांनी दर्शन घेतले होते. तेव्हा पासून या मंदिराला श्रीनागराज दत्त मंदिर संबोधून दरवर्षी श्री.दत्त जयंतीला महाप्रसाद केला जातो.
तरी बजरंगनगरमधील भाविक तसेच श्रीरामपूरातील भाविक-भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवप्रहार प्रतिष्ठान व बेलापूरोड मित्र मंडळ यांनी श्रीरामपूर शहरासह बजरंगनगर भागातील नागरीकांना केले आहे .