शिवप्रहार न्युज - उंदिरगावचा तरुणींचे उत्तुंग यश...

शिवप्रहार न्युज -  उंदिरगावचा तरुणींचे उत्तुंग यश...

उंदिरगावचा तरुणींचे उत्तुंग यश...

श्रीरामपूर- नेपाळ येथील पोखरा येथे आयोजीत आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेमध्ये उंदिरगावचा तरुणींनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे,युथ गेम काउंसील ऑफ इंडीया टीममध्ये उंदिरगावचा कु वैष्णवी हजारे,कु सायली आसने तसेच कु धनश्री डोखे या तरुणींनी नेत्रदिपक कामगीरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे त्यांना भास्करराव गलांडे पाटील विद्यालय, उंदिरगाव येथील क्रीडा शिक्षक श्री लांडगे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.उंदिरगावातील ग्रामस्थांनी गावातील लेकींचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं म्हंटलं आहे.त्याचप्रमाणे उंदिरगाव शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंचा सहकुटुंब सत्कार करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

        याप्रसंगी अशोकचे मा चेअरमन सुरेश पा गलांडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे,अशोकचे विद्यमान संचालक विरेश गलांडे,सरपंच गोलवड, प्रकाश ताके,बाळासाहेब पडोळे,सोपान नाईक सर, आप्पासाहेब ताके, दिलीप नाईक,अमोल नाईक आप्पा डोखे, दादासाहेब हजारे,सर्जेराव आसने त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे सतीष नाईक,अनिल भालदंड, प्रमोद भालदंड,अनिल रोकडे,नवनाथ गायके, गोकुळ भालदंड,मनोज बोडखे,पिंटु काळे, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी सर्व उपस्थित ग्रामस्थांचे सागर गि-हे यांनी आभार मानले