शिवप्रहार न्युज - हळदीला निघालेल्या महिलेचे गंठण मारले...
हळदीला निघालेल्या महिलेचे गंठण मारले...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- पतीच्या मावस भावाच्या मुलाच्या हळदीला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे गंठण ओढून नेण्याची घटना टाकळीभानमधील घोगरगाव रोडवर घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब कचरू नागरे, रा. ओझर बु., ता. संगमनेर यांचा मावस भाऊ मिलिंद सानप, रा. घोगरगाव, ता. नेवासा यांच्या मुलाची हळद असल्याने आणि दुसऱ्या दिवशी लग्न असल्याने ते आपली पत्नी चंद्रकला यांच्याबरोबर आपल्या प्लॅटिना मोटारसायकलवरून घोगरगावला जाण्यासाठी दुपारी १ वा. निघाले होते. दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान नागरे पती-पत्नी टाकळीभान ते घोगरगाव रोडवरून मोटारसायकलवरून जात असताना कोकणे वस्तीच्याजवळ पाठीमागून एक भरधाव मोटारसायकल आली. त्यावर दोघे इसम बसलेले होते. त्यांनी नागरे यांच्याजवळून मोटारसायकल भरधाव जवळून घेत नागरे यांच्या पत्नीच्या गळयात असणारे गंठण बळजबरीने ओढून ते तोडून हे दोघे गंठनचोर घोगरगावच्या दिशेने फरार झाले.
याप्रकरणी अज्ञात दोन गंठनचोरांविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.